मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा मुख्यमंत्री होणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेच्या पाठिंब्याने राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. या वेळी राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांप्रमाणे आम्ही सत्ता मिळवण्यासाठी स्वार्थी भूमिका घेतलेली नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आम्ही कायम विकासाचे राजकारण केले आहे. महायुतीला निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळतील, असा आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या हलालमुक्त दिवाळी अभियानाला काणकोणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद !

काणकोण तालुक्यात यासंबंधी बागायतदार बाजाराच्या दुकानावर, चावडी, चाररस्ता आदी ४ रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आलेले ‘हलालमुक्त दिवाळी साजरी करूया’, हे फलक पाहून धर्माभिमान्यांनी समाधान व्यक्त करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दिंडोरी (जिल्हा नाशिक) येथील रामशेज गड १०१ टेंभे, २१ मशाली आणि १००१ दिव्यांनी उजळला !

‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !

मुख्यमंत्री म्हणजे सुतळी बाँब ! – संजय शिरसाट, शिवसेना

‘एबीपी माझा’ या वाहिनीवर बोलतांना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना सुतळी बाँबशी केली. तो फोडायला धाडस लागते आणि एकदाच फुटतो; पण क्रांती घडवतो, असे ते म्हणाले.

५० लाख रुपये उत्पन्न असलेले उमेदवार युगेंद्र पवार यांची मालमत्ता ५ वर्षांत ५० कोटी !

सर्वसामान्याला लाखाचे कोटी करण्यात संपूर्ण आयुष्य वेचावे लागते; पण राजकारणात लाखाचे कोटीत जायला काही दिवसांचा कालावधीही पुरेसा असतो, हे या उदाहरणांवरून लक्षात येते. हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे !

Dagdusheth Ganpati Temple In Thailand : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने उर्जा मिळते ! – उद्योजिका पापा सॉन मिपा

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, थायलंडमध्ये ५० फूट उंच मंदिर साकारण्यात आले आहे. हे गणपति मंदिर ‘लॉर्ड श्रीमंत गणपति बाप्पा देवालय’ या नावाने रवाई बीच फुकेतमध्ये साकारण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील २ नोव्हेंबरला निवडणुकीविषयी घोषणा करणार !

हिंदूंमध्ये फूट पाडून अन्य धर्मियांशी निवडणुकीच्या दृष्टीने होणारी आघाडी राज्याचे अहितच करणार नाही ना ?

शिंदे सांगतील ते काम करीन ! – वनगा, आमदार, शिवसेना

घरी परतल्यानंतर मात्र ते म्हणाले, ‘‘मी माझ्या नातेवाइकांच्या घरी गेलो होतो. माझे तिकीट कापण्यासाठी काही जणांनी षड्यंत्र रचले. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा आहे. यापुढे शिंदे सांगतील ते काम मी करीन.’’

निवडणुकीचे काम करणार्‍या १५० कर्मचार्‍यांना नोटिसा !

२० नोव्हेंबर या दिवशी २ सहस्र २५९ कर्मचार्‍यांसाठी घेण्यात आलेल्या १ दिवसीय प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या १५० कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या