छत्रपती संभाजीनगर – ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर बोलतांना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना सुतळी बाँबशी केली. तो फोडायला धाडस लागते आणि एकदाच फुटतो; पण क्रांती घडवतो, असे ते म्हणाले. संजय राऊतांची तुलना भुईचक्राशी केली. आदित्य ठाकरेंची तुलना सुरसुरीशी (फुलबाजीशी) करून म्हणाले की, लहान मुले ती उडवतात, तर बघतांना चांगले वाटते. सुषमा अंधारे यांची तुलना सापाच्या गोळीशी केली, तर उद्धव ठाकरे यांची तुलना अनाराशी करून म्हणाले की, कुणाला त्रास देत नाहीत. कुणाला टोमणे मारले, तरी परत शांत होतात. गोगावले यांची तुलना रॉकेटशी करून म्हणाले की, सरळ ठेवले तर सरळ जाते, वाकडे ठेवले, तर वाकडे जाते. फडणवीस यांची तुलना बंदुकीशी केली. तर अजित पवारांना सर्व जण तोफेच्या तोंडी घालतात, असे ते म्हणाले. २३ तारखेला आम्ही दिवाळी साजरी करणार, असेही ते या वेळी म्हणाले.