मुंबई – आम्ही कायम विकासाचे राजकारण केले आहे. महायुतीला निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळतील, असा आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत श्रीराम मंदिराची निर्मिती झाल्यावर प्रथम मोठा दीपोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे सूत्र उपस्थित करत प्रभु श्रीराम आमच्या श्रद्धेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशक्यप्राय वाटणारा श्रीराम मंदिराचा प्रश्न सोडवून दाखवला. त्यामुळे मतदार निश्चितच महायुतीला पाठिंबा देतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.