मनोज जरांगे पाटील २ नोव्हेंबरला निवडणुकीविषयी घोषणा करणार !

मराठा-दलित-मुसलमान एकत्र येण्यावर एकमत !

मुसलमान धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी संवाद साधताना मध्यभागी मनोज जरांगे

जालना – विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे कि नाही, या संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी बैठक बोलावली होती. त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अजून काही समीकरणे जुळवणे शेष असल्याने त्यांनी हा निर्णय दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच २ नोव्हेंबर या दिवशी घोषित करणार आहे, असे सांगितले होते; मात्र याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुसलमान धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी संवाद साधला.

या बैठकीत मराठा-दलित-मुसलमान एकत्र येण्यावर एकमत झाले आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता आम्ही एकत्र आलो असून सत्तापरिवर्तन होणार असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. केवळ एकट्या मराठा समाजामुळे निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यामुळे मुसलमान आणि दलित समाजाशीही समीकरणे जुळवण्याचा जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. याच संदर्भात ही निर्णायक बैठक अंतरवाली सराटी येथे बोलावली होती.

संपादकीय भूमिका :

हिंदूंमध्ये फूट पाडून अन्य धर्मियांशी निवडणुकीच्या दृष्टीने होणारी आघाडी राज्याचे अहितच करणार नाही ना ?