शिंदे सांगतील ते काम करीन ! – वनगा, आमदार, शिवसेना

वनगा, आमदार, शिवसेना

पालघर – विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना पक्षाने तिकीट कापल्यानंतर अप्रसन्न झालेले वनगा मागच्या ४ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिक अस्वस्थ होते. वनगा आता घरी परतले आहेत. तिकीट न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका आणि उद्धव ठाकरेंचे कौतुक वनगा यांनी केले होते.  घरी परतल्यानंतर मात्र ते म्हणाले, ‘‘मी माझ्या नातेवाइकांच्या घरी गेलो होतो. माझे तिकीट कापण्यासाठी काही जणांनी षड्यंत्र रचले. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा आहे. यापुढे शिंदे सांगतील ते काम मी करीन.’’