सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित

सर्वोच्च न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सोमवती अमावास्येला दुसरे पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !

केरळमध्ये मंदिराबाहेरील ‘लव्ह जिहाद’च्या प्रसंगाचे चित्रीकरण हिंदुत्वनिष्ठांनी उधळले !

धर्मांधांचे मंदिराबाहेर थेट ‘लव्ह जिहाद’च्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्याचे धाडस होत आहे,

देशात एका दिवसात १ लाख ६९ सहस्र कोरोना रुग्णांची नोंद

चिंताजनक गोष्ट म्हणजे बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे.

१० वीची परीक्षा जूनमध्ये, तर १२ वीची परीक्षा मेच्या शेवटी घेणार !

विद्यार्थ्यांचे आरोग्य ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक काढण्यास शासनाकडून बंदी

गुढीपाडवा आपल्या घरी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.

१४ एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता ! – राजेश टोपे

१४ एप्रिल या दिवशी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय उडवून देण्याची इस्लामिक स्टेटकडून धमकी

रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय उडवून देऊ, अशी धमकी ८ एप्रिलला ई-मेलद्वारे आली होती. या पत्रात ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा उल्लेख होता. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. इमारती भोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शोपियामध्ये आतंकवाद्यांनी ठार होण्यापूर्वी मशिदीला आग लावल्याचा प्रयत्न केल्याचे उघड !

९ एप्रिल या दिवशी सुरक्षादलांनी ५ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले. हे आतंकवादी येथील एका मशिदीमध्ये लपले होते. या आतंकवाद्यांनी मशिदीच्या एका भागाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता, असे आता समोर आले आहे.