केरळमध्ये मंदिराबाहेरील ‘लव्ह जिहाद’च्या प्रसंगाचे चित्रीकरण हिंदुत्वनिष्ठांनी उधळले !

  • धर्मांधांकडून चित्रपटाचे दिग्दर्शन  

  • मंदिराबाहेर मुस्लिम लीगचा झेंडा

केरळमध्ये साम्यवादी सरकार आणि त्यांच्या नियंत्रणात असलेली हिंदूंची मंदिरे यांमुळे धर्मांधांचे मंदिराबाहेर थेट ‘लव्ह जिहाद’च्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्याचे धाडस होत आहे, हे लक्षात घेता मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

पलक्कड (केरळ) – येथील श्रीकृष्णापूरम्मध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘नियम नाडी’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले. वलियायमकुन्नु भगवती मंदिराबाहेर ‘एक हिंदु तरुणी मंदिरात येत असून त्या वेळी एक मुसलमान तरुण तिच्याकडे आकर्षित होत आहे’, असा हा प्रसंग चित्रीत करण्यात येत होता. हिंदूंच्या मंदिराबाहेर जाणीवपूर्वक अशा प्रकारचे चित्रीकरण केले जात असल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून हे चित्रीकरण बंद पाडले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिक, शीनू आणि सलमान करत आहेत. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर मुस्लिम लीग आणि स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांचे हिरवे अन् लाल रंगाचे झेंडे लावण्यासही विरोध केला. हिंदूंच्या विरोधामुळे पोलिसांनी चित्रपट बनवणार्‍यांना दुसर्‍या ठिकाणी नेले. या प्रकरणी गुन्हा नोंदवून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.