कोरोनाविषयक निर्बंधांचा निर्णय येत्या ८ दिवसांत घेणार ! – विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे स्पष्टीकरण

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता ही संख्या गेल्या वर्षी सप्टेंबर मासाच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस्.) या संस्थांनी केलेल्या कोरोनाच्या पहाणी अहवालात काढला आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला मराठी भाषा शिकवावी !

सध्या मी हिंदी भाषा शिकत आहे. यानिमित्ताने मला आदित्य ठाकरे यांनी मराठीही शिकवावी.

आरोपीला क्षमा होणार नाही ! – मुख्यमंत्री

एखाद्याला आयुष्यातून उठवायचा असाही तपास नको. ज्या क्षणी पूजा चव्हाण यांच्या संदर्भातील घटना कळली, त्या क्षणी निष्पक्षपणे तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांना कालबद्ध तपास करण्याचे आणि अहवाल देण्याचे आदेश दिले.

पोलिसांची इतकी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार्‍या पोलीस निरीक्षकांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंद रहाणार ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

पुणे जिल्ह्यात कोविड १९ च्या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश १४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

रस्त्यात सापडलेले दीड लाख रुपये परत करणारे सिंधुदुर्ग येथील प्रमोद हडकर !

तालुक्यातील वायरी, भूतनाथ येथे एका पर्यटन व्यावसायिकाचे रस्त्यात सापडलेले तब्बल दीड लाख रुपये येथील प्रमोद सावळाराम हडकर यांनी त्या व्यावसायिकाला परत केले. घरची परिस्थिती बेताची असलेल्या हडकर यांच्या या प्रमाणिकपणाविषयी त्यांचे गावात कौतुक केले जात आहे.

सरकारी पक्षाच्या नेत्यांना लैंगिक अत्याचाराची मोकळीक दिली आहे का ?

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील ‘शक्ती’ हा कायदा हा केवळ फार्स आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना या कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

(म्हणे) ‘आताच्या व्यवस्थेला घाबरून गप्प राहिलो, तर ते उद्या आपल्या घरापर्यंत पोचू शकतात !’

हत्यांचे लोण आपल्या घरात येण्याची चिंता करणारे दलवाई काश्मीर येथे हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना, इस्लामी आतंकवादामुळे शेकडोंनी बळी गेलेले असतांना कधी असे बोलले नाहीत. 

मतदानपूर्व चाचणीमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार येण्याची शक्यता

एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.

राजीनामा केवळ दडपशाहीतूनच ! – सिनेट सदस्य विष्णु भंगाळे

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांचा राजीनामा !