श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीची न्यायालयात मागणी !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. सरकारनेच ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करून इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक वास्तूंवर जे अतिक्रमण केले आहे, ते हटवून हा समृद्ध वारसा हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्रप्रताप सिंह यांनी येथील दिवाणी न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीचे उत्खनन करण्याची मागणी केली आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाला ज्याप्रमाणे उत्खनन करून पुरावे गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे, तसाच आदेश या प्रकरणात देण्यात यावा. तसेच ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात यावी आणि यात हिंदू आणि मुसलमान दोघांचाही समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमि: याचिकाकर्ता का दावा- औरंगजेब ने तुड़वाया था मंदिर, मस्जिद में कराई जाए खोदाई#Mathura #UttarPradesh #ShahiIdgah #Masjidhttps://t.co/B2kfpgn6Yx
— Amar Ujala (@AmarUjalaNews) April 20, 2021
अधिवक्ता सिंह यांनी म्हटले की, श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित १३.७ एकर भूमीवर असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मंदिर होते. ते औरंगजेबाच्या आदेशाने पाडून तेथे ईदगाह मशीद बांधण्यात आली. या मंदिरातील मूर्ती आगर्यातील लाल किल्ल्याच्या मशिदीच्या पायर्यांच्या खाली पुरण्यात आल्या आहेत. त्या काढण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच केली आहे.