१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण २२८
२. उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ७१४
३. बरे झालेले एकूण रुग्ण ७ सहस्र ३९५
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १० सहस्र ३४३
५. चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ९८
सकाळी ७ ते ११ या वेळेत साहित्य खरेदीसाठी मुभा ! – जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व खाद्य पदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी), कृषी अवजारे आणि शेतमालाशी संबंधित सेवा, पशूखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी साहित्य विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच चालू ठेवता येतील. तथापी या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा देता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
बांदा शहर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या हेतूने आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, तसेच व्यापारी संघ बांदा यांच्या वतीने २० एप्रिल या दिवशी पाळण्यात आलेल्या बांदा शहर बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बांदा शहरातील सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अत्यावश्यक सेवासुद्धा बंद ठेवण्यात आल्या, तर शहरात येणार्या प्रत्येकाची पोलीस आणि गृहरक्षक दलाचे सैनिक यांच्याकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. सबळ कारण नसल्यास त्यांना समज देऊन माघारी पाठवले जात आहे.
दिगशी गावाला जिल्हाधिकार्यांची भेट
वैभववाडी – तालुक्यातील तिथवली-दिगशी गावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गावात भेट देऊन पहाणी केली. तसेच येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.