भारतीय नागरिकाला संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी घोषित करण्याचा पाकचा प्रयत्न भारताने उधळला !  

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला.

वॉशिंग्टन येथे संगीत कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबार करणार्‍या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे हा परिसर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसपासून २ मैलांपेक्षा कमी अंतरावर आहे.

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही ! – भारत

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही. केवळ ‘अब्राहमिक’ धर्मांविरुद्धच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि हिंदु धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचार यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीनचा खोडा

आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्‍या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !

वर्ष २०२१ मध्ये जगभरातील १० कोटींपेक्षा अधिक लोक विस्थापित – संयुक्त राष्ट्रे

या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये ६० लाख, तर फिलिपिन्समध्ये ५७ लाख लोक विस्थापित झाले. गेल्या १० वर्षांत घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेतील चर्चमध्ये गोळीबार : एकाचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ

‘गन व्हॉयलन्स अर्काइव्ह’च्या अहवालानुसार अमेरिकेत गेल्या ४ मासांत २१२ सामूहिक गोळीबारांच्या घटना घडल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ६११ ठिकाणी गोळीबार झाला आहे.

भारताची वाढती शक्तीच हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थिरता स्थापित करू शकते ! – अमेरिका

भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! अमेरिका, युरोप आणि नोटो देश यांनी युक्रेनचा जो विश्‍वासघात केला, तसा ते भारताचाही करेल. यामुळे भारताने अशा ‘मित्रां’पासून सावध राहिले पाहिजे !

अमेरिकेतील गोळीबारात ३ कामगारांचा मृत्यू

मेरीलँड येथे २ लोकांनी एका कारखान्यात घुसून केलेल्या गोळीबारात २ कामगारांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीररित्या घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे.

चीनच्या लडाखजवळील पायाभूत सुविधा धोकादायक ! – अमेरिकी अधिकार्‍याची चेतावणी

जे भारताने सांगायला हवे, ते अमेरिका सांगते ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

६ मास औषध घेतल्याने चाचणीतील सर्व १८ रुग्ण कर्करोगमुक्त !

कर्करोगावरील नव्या ‘डॉस्टारलिमॅब’ औषधाचा परिणाम !