अमेरिकेतील गोळीबारात ३ कामगारांचा मृत्यू

मेरीलँड (अमेरिका) – येथे २ लोकांनी एका कारखान्यात घुसून केलेल्या गोळीबारात ३ कामगारांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीररित्या घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (‘एफ्बीआय’ने) संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या कटात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.