वॉशिंग्टन येथे संगीत कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील यू स्ट्रीट नॉर्थवेस्टमध्ये एका संगीत कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एका पोलीस अधिकार्‍यासह ३ जण घायाळ झाले. गोळीबार करणार्‍या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही.

विशेष म्हणजे हा परिसर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसपासून २ मैलांपेक्षा कमी अंतरावर आहे.