भारताची वाढती शक्तीच हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थिरता स्थापित करू शकते ! – अमेरिका

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताची वाढती शक्तीच हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये स्थिरता स्थापित करू शकते, असे अमेरिकेला वाटते, असे विधान अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांनी केले. ते सिंगापूर येथील ‘शांगरी लॉ डायलॉग’ या कार्यक्रमात बोलत होते.

चीनची आक्रमकता रोखण्यासाठी अमेरिका पूर्णपणे सिद्ध आहे

लॉईड ऑस्टिन म्हणाले की, हिंद-प्रशांत क्षेत्रात चीन आक्रमक धोरण राबवत असून अवैधरित्या समुद्रातील क्षमता वाढवत आहे. चीन भारतासमवेतची सीमेवरील स्थिती अधिक भक्कम करत आहे. चीन तैवानला त्याचा भाग मानतो. तसेच तो व्हिएतनाम, फिलीपाईन्स, ब्रुनेई आणि मलेशिया यांच्या भागांवरही दावा करतो यासाठी तो आक्रमण धोरण राबवतो. अशा वेळी अमेरिका या आक्रमकतेला रोखण्यासाठी त्यांच्या मित्रांसमवेत उभा आहे. आम्ही आमच्या सुरक्षेविषयी कटीबद्ध आहोत.

संपादकीय भूमिका 

भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! अमेरिका, युरोप आणि नोटो देश यांनी युक्रेनचा जो विश्‍वासघात केला, तसा ते भारताचाही करेल. यामुळे भारताने अशा ‘मित्रां’पासून सावध राहिले पाहिजे !