श्रीलंकेने आणीबाणी उठवली
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अराजकसदृश्य स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटबया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. तसेच ‘संसदेत बहुमत सिद्ध करणार्या पक्षाला सत्ता सोपवण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.
श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे; मात्र महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदी कायम आहेत. देशातील सर्वपक्षांचे सरकार स्थापन करण्यात येणार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात सहभागी करण्यात येणार आहे.
श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे.
श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे नागरिकांकडून होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वीच नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केले होते.
आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यावर हिंसा चालू झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुरासमवेतच पाण्याचा मारा करून आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने स्थानिकांनी ३१ मार्चच्या रात्री राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘राष्ट्रपतींनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.
श्रीलंकेत गॅस सिलिंडरसाठी पहाटे ४ वाजल्यापासून लोकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. रांगेतील सहस्रावधी लोकांपैकी केवळ ३०० लोकांना सिलिंडरसाठी कूपन मिळत आहे, अशी व्यथा श्रीलंकेच्या बट्टीकोला परिसरात रहाणार्या ३१ वर्षीय शिक्षिका वाणी सुसई यांनी मांडली.
अभूतपूर्व आर्थिक संकटाशी सामना करत असणाऱ्या तुमच्या देशाला आमचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेऊन त्यांना दिली.
श्रीलंकेत सध्या विदेशी चलनाच्या गंगाजळीची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच कागदांच्या टंचाईमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाच रहित करण्यात आल्या होत्या.