श्रीलंकेमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी

नवी देहली – श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विरोधात देशभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.