श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या त्यागपत्रानंतर प्रचंड हिंसाचार
राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले
खासदाराने केली आत्महत्या !
राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले
खासदाराने केली आत्महत्या !
दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू असतांनाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी त्यागपत्र दिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांकडून त्यांचे त्यागपत्र मागण्यात येत होते.
देशात चालू असलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे महिंदा राजपक्षे यांनी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे यांना पदावरून हटवले आहे.
श्रीलंकेच्या अधःपतनाचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘वायर’ संकेतस्थळाच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध पर्यावरणवादी वंदना शिवा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी अधःपतनाला जैविक शेती नाही, तर कोविड, रासायनिक खते आणि कर्ज कारणीभूत असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, वर्ष २०२० मध्ये रासायनिक खतांच्या वापरावर घातलेल्या बंदीसाठी मला खेद आहे. या निर्णयामुळे देशातील धान्याचे उत्पादन पुष्कळ अल्प झाले. यामुळे नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. माझा हा निर्णय चुकीचा होता.
गेल्या काही आठवड्यांपासून भारताशेजारील देश श्रीलंकेवर भीषण संकट ओढावले आहे. तेथील सत्तेवर असलेल्या राजपक्षे परिवाराच्या चुकीच्या धोरणांमुळे श्रीलंका आर्थिक डबघाईला आली. यामुळे संतप्त जनतेकडून हिंसक आंदोलने करण्यात आली.
श्रीलंकेच्या चलनाच्या मूल्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर दागिने खरेदी करणार्यांची संख्या अत्यंत अल्प आणि ते विकणारे अधिक झाले आहेत.
श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे.
मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारत सातत्याने साहाय्य पुरवत आहे. भारताने श्रीलंकेला इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा केला.