पाकिस्तान सरकारकडून पहिल्यांदाच हिंदूंच्या मंदिरांच्या देखभालीसाठी ‘हिंदु मंदिर व्यवस्थापन समिती’ची स्थापना

अशी समिती स्थापून पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवर जिहादी करत असलेली आक्रमणे बंद होणार आहेत का ? ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करतो’, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीच पाक अशा समितीची स्थापना करत आहे !

पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना बोलावून व्यक्त केली चिंता !

हरिद्वार येथील धर्मसंसदेतील वक्त्यांच्या मुसलमानांविषयीच्या कथित आक्षेपार्ह विधानांचे प्रकरण

कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची आणि मूर्तींची तोडफोड

पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वाराचा प्रसाद देण्यासाठी सिगारेटच्या वेष्टनाचा वापर !

एरव्ही भारताच्या विरोधात गरळओक करणारे खलिस्तानवादी पाकिस्तानातील या कृत्याचा चकार शब्दानेही निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! यातून ‘खलिस्तानवाद्यांना जिहादी पाककडून शीख पंथाचा द्वेष केलेला चालतो’, असे म्हणायचे का ?

पाकिस्तान दिवाळखोर देश झाला आहे !

पाकच्या महसूल मंडळाचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांचा घरचा अहेर ! पाकने चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामुळे एका पाकिस्तानी नागरिकावर ७५ सहस्र रुपये कर्ज झाले आहे.

सिंध आणि बलुचिस्तान यांना पाकपासून स्वतंत्र करा !

पाकमधील राजकीय पक्ष ‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांची संयुक्त राष्ट्रे, भारत आणि ब्रिटन यांच्याकडे मागणी

पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !

स्वतःला पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी म्हणवून घेणारे भारतातील लोक याविषयी बोलतील का ? कि धर्मांधांना हे सर्व क्षम्य आहे, असे त्यांना वाटते ?

(म्हणे) ‘भारतात रा.स्व. संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी अल्पसंख्यांकांना बाजूला लोटत आहे !’

पाकने तेथील अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान गप्प का ?

(म्हणे) ‘आम्ही भारताप्रमाणे हिंसेच्या घटनांकडे दुर्लक्ष करत नाही !’

भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ?

(म्हणे) ‘ती लहान मुल आहेत, ती जोशात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काम करून मोकळी होतात !’

असे राज्यकर्ते असणार्‍या देशात निरपराध्यांच्या हत्या होणार नाहीत, तर काय होणार ? याचा विचार करून जागतिक समुदायाने पाकला बहिष्कृत करणे, हाच एकमेव उपाय ! श्रीलंकेने आणि भारताने तरी हा निर्णय घेतला पाहिजे !