पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !

  • स्वतःला पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी म्हणवून घेणारे भारतातील लोक याविषयी बोलतील का ? कि धर्मांधांना हे सर्व क्षम्य आहे, असे त्यांना वाटते ? –  संपादक
  • भारतातील एखादे तरी मंदिर, मठ अथवा आश्रम येथे असे शिक्षण दिले जाते का ? तरीही हिंदूंना भगवा आतंकवादी, तालिबानी, असहिष्णु ठरवण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या ! –  संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची धर्मांधांच्या जमावाने हातपाय तोडून जिवंत जाळून हत्या केली होती. आता ईशनिंदा करणार्‍यांना कशा प्रकारे ठार करायचे, याचे प्रशिक्षण पाकच्या एका मशिदीमध्ये मुलींना देण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पाकमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गुल बुखारी यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

गुल बुखारी यांनी म्हटले आहे, ‘इस्लामाबादच्या लाल मशिदीत विद्यार्थी ईशनिंदा करणार्‍या व्यक्तीची हत्या करण्याचा सराव करत आहेत.’ या व्हिडिओमध्ये शेकडो मुली आणि महिला धार्मिक कपडे घालून उभ्या असलेल्या दिसत आहेत. मुलींच्या समोर महिला तलवार घेऊन एका पुतळ्याचा शिरच्छेद करत आहेत.