पदयात्रेच्या वेळी कायद्याचा भंग केल्याविषयी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ संघटनेच्या विरोधात आमदार फ्रान्सिस्को पाचेको यांची तक्रार
अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला एखादी संघटना नियमबाह्य कृती करत असल्याचे का लक्षात येत नाही ?
अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला एखादी संघटना नियमबाह्य कृती करत असल्याचे का लक्षात येत नाही ?
गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनानिमित्त पुढील वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी ठेवलेली सर्वपक्षीय बैठक शासनाकडून रहित करण्यात आली आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप यांनी या बैठकीवर बहिष्कार घालणार, असे आधी सांगितले होते.
नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक जीप उडवून लावल्याने २ नागरिक घायाळ झाले. बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरूंग पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दोन मासांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारलेले डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तातडीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी स्थानांतर करण्यात आले आहे.
पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.
तालुक्यातील मालवण-चौके-कुणकवळे-कसाल आणि मालवण-धामापूर-कुडाळ या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळात फेरपालट करून अकार्यक्षम व्यक्तींऐवजी कार्यक्षम व्यक्तींना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी बंदर आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.
गोवा शासनाकडून गोव्याचा ६० वा मुक्तीदिन सोहळा वर्षभर साजरा करण्याविषयी आम्ही सहमत नाही, असे विधान गोवा फॉरवर्ड पक्षाने केले आहे.
पौराणिक कथांमधील घटनांचा भावार्थ लक्षात न घेता केवळ बौद्धिक तर्क काढून समाजाचा बुद्धिभेद करायचा, हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे काम आहे. त्यामुळे जनतेने शास्त्र समजून घेऊन त्यांच्या तर्कांचे खंडण केले पाहिजे अन् सणही साजरे केले पाहिजेत.
आर्थिक स्थिती बिकट असतांना आणि कोविड महामारीचे संकट असतांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याऐवजी शासनाने गोव्याच्या उत्कर्षासाठी दूरदृष्टीने नियोजन करावे.