भारताच्या अंतर्गत सूत्रांवर बोलणे बंद करा !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !

भारतात आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी  

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.

गोव्यात गांजा उत्पादनाविषयी राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया !

गांजा लागवडीच्या प्रस्तावावर तूर्तास कोणताही विचार नाही. लागवड जरी केली, तरी ती केवळ औषधापुरतीच असेल. गांजावरून चालू असलेल्या चर्चा चुकीच्या असून गांजा लागवडीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

रेडी येथील समुद्रात बुडणार्‍या पर्यटकाला जीवरक्षकाने वाचवले

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील समुद्रात बुडणारा देहली येथील पर्यटक परवेझ खान याला येथील ‘जीवरक्षक’ संजय गोसावी यांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले.

बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि पीडित यांचा तपशील प्रसारमाध्यमांनी उघड करू नये ! – तुषार पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ मध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या वृत्तामध्ये बालकाची ओळख उघड होईल, असा तपशील उघड होणार नाही, असे नमूद असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

प्रत्येक हिंदु भगिनीमध्ये शौर्य जागृत करण्याची आज नितांत आवश्यकता ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

युवतींमधील शौर्य जागृत करणे, जीवनातील साधनेचे आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवणे या दृष्टीकोनातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती वर्ग’ आयोजित करण्यात आला होता.

एस्.टी.ची सेवा अधिक सक्षम करणार !  – अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

कुडाळ शहरातील गांधी चौक येथे एस्.टी.च्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले.

शिरोडा, फोंडा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक विष्णुबुवा फडके यांचे निधन !

सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक विष्णुबुवा फडके (वय ९८ वर्षे) यांना ३० डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी देवाज्ञा झाली. ते सनातनच्या साधिका सौ. सुविधा फडके यांचे सासरे होत.

निधन वृत्त

सनातनच्या साधिका सौ. भारती बाडगी यांच्या आई श्रीमती मंगला यशवंत फडके (वय ९१ वर्षे) (आध्यात्मिक पातळी – ६१ टक्के) यांचे २८ डिसेंबर या दिवशी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.