मुंबई पोलिसांची भिकार्‍यांना पकडण्याची मोहीम

प्रत्येक जण त्याच्या प्रारब्धानुसार वागत असतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भिकार्‍यांनाही साधना सांगितली, तर त्यांचे प्रारब्ध हळूहळू न्यून होऊ शकते. त्यामुळे त्यांना काम देणे आणि साधना सांगणे, यातूनच भिकार्‍यांची संख्या न्यून होऊ शकते.

बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक

भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.

राजभवनातील संबंधित अधिकार्‍यांवर दायित्व निश्‍चित करण्यात यावे !

राज्यपालांचे विमान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवल्याच्या प्रकरणावरून ते बोलत होते.

लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे ! –  मुख्यमंत्री

मागील काही दिवस, काही मास लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही पुढे आले आहेत. या प्रकरणात तसे काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले दिसत नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत असल्यामुळे कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.

महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षांत जंगली प्राण्यांच्या आक्रमणात २१४ लोकांचा मृत्यू !

मानवाने निसर्गावर आक्रमण केल्याचा हा परिणाम असून तो त्यालाच भोगावा लागत आहे, हे याचे उत्तम उदाहरण आहे !

श्री शिवशंभू जागर समिती आणि समस्त पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने ‘देहली विजयदिन सोहळा’ साजरा !

या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती महादजी शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक श्री. ब.हि. चिंचवडे यांचे ‘मराठ्यांचा देहली दिग्विजय’ या विषयावर मार्गदर्शन झाले.

गोरक्षकांच्या सतर्कतेने ११ गोवंशियांची कत्तलींपासून सुटका !

गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्याचे वृत्त पोलिसांना न कळता गोरक्षकांना अगोदर कसे कळते ? याचा पोलिसांनी विचार करून त्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असे गोरक्षकांना वाटते.

जम्मू बस आगारामध्ये सापडली ७ किलो स्फोटके !

पुलवामा येथील आक्रमणाला २ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचा कट रचला जात होता

मोरगाव आणि सिद्धटेक येथील माघी यात्रेस प्रारंभ !

कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पालखीचे देव गाडीमधून मोरगावकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली आहे.