मुंबई पोलिसांची भिकार्‍यांना पकडण्याची मोहीम

  • भिकार्‍यांना स्वीकार केंद्रांत ठेवून त्यांचा खर्च सरकारने का करावा ? हा खर्च सरकार शेवटी कष्टकरी जनतेच्या पैशातूनच करणार ? असे करण्याचा सरकारला काय अधिकार ? अशाने अनेक ऐतखाऊ भिकारी म्हणून या केंद्रात जातील ! अनेक भिकारी बरेच श्रीमंत असल्याचे आपण नेहमी ऐकतो.
  • प्रत्येक जण त्याच्या प्रारब्धानुसार वागत असतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भिकार्‍यांनाही साधना सांगितली, तर त्यांचे प्रारब्ध हळूहळू न्यून होऊ शकते. त्यामुळे त्यांना काम देणे आणि साधना सांगणे, यातूनच भिकार्‍यांची संख्या न्यून होऊ शकते.

मुंबई – येथे पोलिसांकडून भिकार्‍यांना पकडण्याची मोहीम राबवण्यास आरंभ करण्यात आला आहे. सहपोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. भिकार्‍यांना पकडून त्यांना चेंबूर येथील स्वीकार केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत दिवसेंदिवस भिकार्‍यांची संख्या वाढत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे मागितले जातात. मुलांचीही मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करून पैसे मागितले जातात.