|

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत असल्यामुळे कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. या प्रकरणातील मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. त्यांनी गांभीर्य लक्षात घेतलेले दिसत नाही किंवा त्यांनी त्या ‘क्लीप्स’ ऐकलेल्या दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी; म्हणजे कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हे त्यांना कळेल, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरातील बाहेर आलेल्या सर्व ‘क्लीप्स’ची सत्यता तत्काळ पडताळण्यात यावी. ‘यातील आवाज नेमका कुणाचा आहे ?’, हे स्पष्ट करावे. हा आवाज कुणाचा आहे, हे सर्वांना माहीत आहे; मात्र ते पोलिसांनी समोर आणायला हवे. जेथे गुन्हा झाल्याचे स्पष्ट होत असते, अशा प्रकरणात पोलीस सुमोटो कारवाई करत गुन्हा नोंदवू शकतात; मात्र पोलीस जाणूनबुजून ही कारवाई करत नाहीत. हे पूर्णपणे चुकीचे आहे.’’
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस