बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा !

भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.

शाळा दुरुस्तीच्या कामांत वेळकाढूपणा करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची १२६ कामे एकत्रितपणे का चालू केली नाहीत ?  शासकीय निधी आणि वेळ यांचा योग्य उपयोग व्हायला हवा. दुरुस्तीसाठी विलंब का लागला ? – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती करणार !

निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?

गोवा : राज्यसभेवर सदानंद शेट तानावडे यांची बिनविरोध निवड

विरोधकांकडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकू शकत नाही, याची स्वीकृतीही विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे.

‘समस्येवर तोडगा नाही, तर आपत्ती अटळ !’

अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी प्रतिवर्षी या ठिकाणी भेट देऊन आश्वासने देतात; पण येथील कचरा समस्या तशीच आहे !

चातुर्मासात युवकांनी उपवास करण्यासह  ‘डिजिटल’ उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालावेत ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी

युवकांनी धार्मिक व्रत करण्यासह गूगल, व्हॉटस्ॲप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि स्नॅपचॅट या भ्रमणभाषवरील प्रतिदिन किमान एकाचा वापर न करण्याचा निश्चय केला पाहिजे.

वेगळ्‍या रहात असलेल्‍या पत्नीला उदरनिर्वाह भत्त्यासह ३ पाळीव श्‍वानांसाठीही पैसे देण्‍यास सांगितले !

यावर न्‍यायालयाने म्‍हटले की, पाळीव प्राणी हा एका सभ्‍य जीवनशैलीचा अभिन्‍न भाग आहे. मनुष्‍याच्‍या स्‍वस्‍थ जीवनासाठी पाळीव प्राणीही आवश्‍यक आहे, कारण नाती तुटण्‍यामुळे झालेल्‍या भावनिक दु:खाला अल्‍प करण्‍यासाठी ते साहाय्‍य करू शकतात….

गोवा एक्‍सप्रेसमधील ‘स्‍लिपर कोच’ न्‍यून केल्‍याने प्रवाशांना अनेक अडचणी !

गोवा एक्‍सप्रेसमधील शयनयान डब्‍यांची संख्‍या न्‍यून केल्‍यावर प्रवाशांना कोणत्‍या अडचणी येतील, याचा अभ्‍यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्‍यास न करता निर्णय घेतल्‍याने प्रवाशांना येणार्‍या अडचणींचे दायित्‍व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?

१८३ जागांसाठी १ सहस्र ३०० अर्ज प्राप्‍त !

प्राथमिक विभागासाठी १२३, तर माध्‍यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. ही नेमणूक तासिका तत्त्वावर केली जाणार आहे. एका तासिकेचे शुल्‍क १२५ रुपये इतके आहे. दिवसाला ६ तासिका याप्रमाणे दिवसाला ७५० रुपये याप्रमाणे ही नेमणूक केली जाणार आहे…..

पुणे येथे मैत्रिणीवर अत्‍याचार करणार्‍या व्‍यक्‍तीस १० वर्षे सक्‍तमजुरी !

शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीवर अत्‍याचार करणार्‍या अभिनय साही या तिच्‍या मित्रास न्‍यायालयाने १० वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. २७ ते २८ फेब्रुवारी २०१६ दरम्‍यान हा प्रकार घडला आहे.