वेगळ्‍या रहात असलेल्‍या पत्नीला उदरनिर्वाह भत्त्यासह ३ पाळीव श्‍वानांसाठीही पैसे देण्‍यास सांगितले !

मुंबई येथील न्‍यायालयाचा पतीला आदेश

मुंबई – पतीपासून वेगळ्‍या झालेल्‍या महिलेला उदरनिर्वाह भत्त्यासह तिने पाळलेल्‍या तीन श्‍वानांसाठीही पतीला पैसे द्यावे लागतील. मुंबईतील एका न्‍यायालयाने एका प्रकरणात हा आदेश दिला. ५५ वर्षीय महिलेने म्‍हटले होते की, तिला स्‍वास्‍थ्‍यसंबंधी विविध तक्रारी आहेत. तसेच तिने पाळलेले तीन श्‍वान आहेत. त्‍यामुळे पतीकडून उदरनिर्वाह भत्त्यासह श्‍वानांना पाळण्‍यासाठीचा खर्चही मिळावा. यावर न्‍यायालयाने म्‍हटले की, पाळीव प्राणी हा एका सभ्‍य जीवनशैलीचा अभिन्‍न भाग आहे. मनुष्‍याच्‍या स्‍वस्‍थ जीवनासाठी पाळीव प्राणीही आवश्‍यक आहे, कारण नाती तुटण्‍यामुळे झालेल्‍या भावनिक दु:खाला अल्‍प करण्‍यासाठी ते साहाय्‍य करू शकतात. संबंधित महिलेचा वर्ष १९८६ मध्‍ये विवाह झाला होता.