विरोधकांकडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय
पणजी, ११ जुलै (वार्ता.) – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ११ जुलै या दिवशी अर्ज प्रविष्ट केला आहे. विरोधी गटातील ७ आमदारांच्या ११ जुलै या दिवशी झालेल्या बैठकीत राज्यसभेसाठी विरोधकांकडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकू शकत नाही, याची स्वीकृतीही विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे.
BJP Goa President Shri @ShetSadanand expresses a heartfelt gratitude to Leaders & Karyakartas after filing Rajya Sabha nomination. pic.twitter.com/cKSqwajxLN
— BJP Goa (@BJP4Goa) July 11, 2023
राज्यात भाजपप्रणित सरकारकडे २ तृतीयांश बहुमत असल्याने सदानंद शेट तानावडे यांची निवड जवळजवळ बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदानंद शेट तानावडे अर्ज प्रविष्ट करण्यासाठी विधानसभा सचिवांच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मंत्रीगण यांची उपस्थिती होती.
BJP Goa President Shri @ShetSadanand filed his nomination for Rajya Sabha at the Secretariat in Panaji in the presence of Chief Minister @DrPramodPSawant, Ministers & MLAs. pic.twitter.com/cjO31BlE6H
— BJP Goa (@BJP4Goa) July 11, 2023
गोव्यातील राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांची कारकीर्द २८ जुलै या दिवशी संपत आहे. १३ जुलै हा अर्ज प्रविष्ट करण्याचा शेवटचा दिवस आहे. १४ जुलै या दिवशी अर्जांची छाननी आणि १७ जुलै या दिवशी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २४ जुलै या दिवशी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत ‘आप’ने त्यांचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.