
सांगली, २३ फेब्रुवारी – पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रंगराव बाबू जोंग (रहाणार राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या वयोवृद्ध मेंढपाळाने एका शेतात मेंढ्यांचा कळप उतरवला होता. मेंढपाळ बेसावध असताना लांडग्याने केलेल्या आक्रमणात त्यांच्याकडील १२ शेळ्या आणि मेंढ्या यांचा मृत्यू झाला. या गंभीर संकटात जोंग यांनी बह्मनाळ येथील जनसेवा भाजीपाला संघटनेचे सचिव अजित राजोबा यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन केले. ही गोष्ट राजोबा यांनी संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या कानावर घातली. काटकर यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करून साहाय्य करण्याचे आवाहन केले आणि अल्पावधीत ७ सहस्र रुपयांची रक्कम जमा झाली.
जनसेवा फळे-भाजीपाला संघटनेच्या पुढाकाराने संजयनगर आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी जमवलेल्या ७ सहस्र रुपयांचा निधी मेंढपाळाला देण्यात आला. या वेळी जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर, उपाध्यक्ष कैस अलगुर, सचिव अजित राजोबा यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. ‘अन्य कुणी या मेंढपाळाला आर्थिक साहाय्य करणार असतील, तर त्यांनी कोणत्याही आठवडा बाजारात जनसेवा संघटनेच्या पदाधिकार्यांना संपर्क करावा’, असे आवाहन अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केले आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !