नाशिक येथील रामशेज गडावर सापडल्या ११ गुहा !

दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले.

मध्यप्रदेशमध्ये दलित हिंदु युवतीचे बलपूर्वकने धर्मांतर करणार्‍या लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्‍वर्या चव्हाण हिला मुले झाली. इरशाद आणि त्याचा भाऊ मुकीम याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. तिने धर्मांतराला नकार दिल्यामुळे मुकीम याने तिच्यावर बलात्कार केला.

शेट्येनगर (रत्नागिरी) येथील झालेल्या स्फोटप्रकरणात कोणत्याही स्फोटक पदार्थांचे नमुने मिळाले नाहीत

प्राथमिक स्तरावर प्रथम घायाळ झालेल्या अशफाक काझी यांच्या जबानीवरून गॅस सिलिंडच्या ‘लिकेज’मुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती.

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले (राजापूर) येथील टोलवसुली चालू

राजापूर तालुक्यातील हातिवले हा ‘टोलनाका’ चालू करण्यात आला असून ११ एप्रिलपासूनच टोलवसुली चालू करण्यात आली आहे. स्थानिकांना मात्र या टोलमधून ७० टक्के सूट देण्यात आली आहे.

लोटे (खेड) येथील गोशाळेच्या जागेचा प्रश्न न सुटल्याने ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण  

गोशाळेत सध्या ११०० गायी आहेत. त्यांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गायींची सेवा केली जाते; मात्र त्यांचा दिवसाचा खर्च अनुमाने ६० सहस्र रुपये येतो. त्यामुळे हा खर्च परवडत नाही.

धर्मांध मुसलमानाच्या छळाला कंटाळून दलित हिंदु युवतीची आत्महत्या !

लव्ह जिहाद्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून हिंदु युवतीच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून कारागृहात डांबा ! ‘दलित-मुसलमान भाई भाई’, म्हणणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ?

रत्नागिरी-८ बी ही भाताची नवीन जात विकसीत : महाराष्ट्रासह ६ राज्यांत मागणी

रत्नागिरी- ८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसांत तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली, तर अखंड तांदूळ अधिक होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच अल्प येते.

उमेदवारी मिळण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या समर्थकांकडून मंदिर आणि मशीद येथे प्रार्थना !

काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या करणार्‍याची माहिती देणार्‍याला ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !

एन्.आय.ए.चे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी याचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत; परंतु अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.

सरसंघचालकांच्या नावे प्रसारित करण्यात आलेल्या बनावट पत्रात मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !