जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ केवळ साधनेनेच मिळते ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपल्या जीवनातील ८० टक्के दुःखांच्या मागे आध्यात्मिक कारण असते आणि त्यावर उपाय म्हणून साधना करणे आवश्यक आहे. जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो.

तुमसर (जिल्हा भंडारा) येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील ७ दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा !

वर्ष २०१४ मधील  बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा ११ एप्रिल या दिवशी अंतिम निकाल लागला. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तुमसर शहरातील रामकृष्णनगर येथे रहाणारे संजय सोनी, पूनम सोनी, ध्रुमिल सोनी या एकाच कुटुंबातील तिघांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती.

माजी आमदार अनुसया खेडकरसह १८ जणांना ५ वर्षे सक्तमजुरी !

७ जून २००८ या दिवशी शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर आणि त्यांचे पुत्र महेश खेडकर यांच्यासह १७ जणांनी हिंसक आंदोलन करून राज्य परिवहन मंडळाच्या ८ बसगाड्यांची हानी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला !

जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली असून १४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

राज्यातील गावागावांत मिळणार वड-पिंपळ वृक्षांची छाया !

प्रत्येक जिल्ह्यातील २५ गावांमध्ये वन उद्यानांची निर्मिर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुलिंब आणि देशी आंबा या वृक्षांच्या पंचायतन वन उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.

‘लेट्स चेंज’ या चित्रपटातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार स्वच्छतेचे धडे !

केंद्रशासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारित असल्यामुळे हा चित्रपट पहाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे.

अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन भ्रमणभाष संच !

अंगणवाडी सेविकांना सरकारने भ्रमणभाष संच दिले होते; मात्र हे संच जुने झाल्याने सतत बंद पडत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते भ्रमणभाष संच परत करून नवीन संच देण्याची मागणी केली होती.

पुणे मेट्रोच्या कामात अनेक त्रुटी !

मेट्रो स्थानकांच्या उभारणीत अनेक त्रुटी असल्याचे शहरातील ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्याने मेट्रोस्थानकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, विदर्भ रुक्मिणी पीठ, कौंडण्यपूर

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते.