‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले.

गोवा : वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासहित श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी प्रार्थना करून दिनक्रमाला प्रारंभ केला.

पुणे येथील ‘कॉसमॉस बँक सायबर आक्रमण’ प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा !

गुन्‍हेगारांनी गणेशखिंड येथील ‘कॉसमॉस बँके’च्‍या मुख्‍यालयातील ‘सर्व्‍हर हॅक’ करून ११ ते १३ ऑगस्‍ट २०१८ या कालावधीमध्‍ये ९४ कोटी रुपये काढून घेतले होते.

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये !

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये आहे. जिल्‍ह्यातील ३१ लाख ४८ सहस्र १९४ मतदारांपैकी २० लाख ४६ सहस्र ३२३ मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डला जोडलेले असूून ही आकडेवारी ६५ टक्‍के आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी कागदपत्रांवरील औरंगाबाद नाव पालटू नका ! – मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ‘नामांतराविषयी अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत औरंगाबादचे नाव सरकारी कागदपत्रांवर पालटू नका’, अशा सूचना केल्‍या आहेत.

वाल्‍मीकि रामायण ही विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवस्‍थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी कथा ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

वाल्‍मीकि रामायणात सर्व मानवी मर्यादांचे पालन करतांनाही, कशा प्रकारे तुम्‍ही प्रेम, धर्म, कर्तव्‍य यांचे पालन करू शकता याचे योग्‍य उदाहरण दिले आहे. यामुळेच लोकांनी विशेषकरून तरुण पिढीने ‘वाल्‍मीकि रामायण’ अवश्‍य वाचले पाहिजे,असा सल्लाही त्‍यांनी दिला.

कराड येथे जल्लोषपूर्ण वातावरणात ऐतिहासिक दरबार मिरवणूक पार पडली !

पारंपरिक शिवजयंती उत्‍सवानिमित्त ‘हिंदु एकता आंदोलना’च्‍या वतीने प्रतिवर्षी काढण्‍यात येणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत तरुणाईसह आबालवृद्धांना मोठे आकर्षण असते.

धर्म अभ्‍यासकासह ८ जण पसारच; अफवांमुळेच जमाव जमल्‍याचा ‘एस्.आय.टी.’चा निष्‍कर्ष !

२४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्‍या नामांतरानंतर राजकीय नेत्‍यांच्‍या एकमेकांविरोधातील वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमध्‍ये सातत्‍याने वाढ झाली होती. नामांतराच्‍या विरोधात, तसेच समर्थनार्थ आंदोलने झाली, मोर्चे निघाले.

४ सहस्र शेळ्या-मेंढ्यांची बोटीतून वाहतूक : १६ जणांना केली अटक

बोटीत असलेल्या खलाशांकडून सीमा शुल्क पथकाला समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

चिपळूण येथे ‘एकल वापर’ प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या १० व्यावसायिकांवर कारवाई

चिपळूण येथील बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने येथील नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशवी वापरणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.