चिपळूण येथे ‘एकल वापर’ प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या १० व्यावसायिकांवर कारवाई

५० किलो ‘एकल वापर’ पिशव्या जप्त

चिपळूण – येथील बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने येथील नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशवी वापरणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ५० किलो एकल वापर पिशव्या प्रशासनाने जप्त केल्या आहेत. या प्रकरणी १० व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून  ३ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

येथील नगर परिषद प्रशासनाकडून ‘नागरिकांसह, व्यापार्‍यांनी एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा’, यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. असे असूनही अनेक छोटे विक्रेत्यांसह मोठे व्यापारीही बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर करत आहेत.