आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

ते वीरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा उपस्थित होते.

एन्.आय.ए.कडून पी.एफ्.आय.च्या देशभरातील १७ ठिकाणी धाडी

यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.

केदारनाथ मंदिर दर्शनासाठी उघडले !

हिवाळ्यात हे मंदिर बंद ठेवण्यात येते. हिवाळा संपल्यावर ते पुन्हा उघडण्यात येते. येथे गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे.

सातबारा उतार्‍याची प्रत देणारे यंत्र ३ वर्षांहून अधिक काळ धूळखात पडून !

‘ए.टी.एम्.’ सारख्‍या दिसणार्‍या एका यंत्रात काही नाणी टाकल्‍यावर सामान्‍य नागरिकांना तात्‍काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्‍हाधिकारी कार्यालयांत बसवण्‍यात आली होती.

स्‍वच्‍छ आणि सुंदर शहर स्‍पर्धेत महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) नगरपालिका राज्‍यात दुसरी !

महाराष्‍ट्र शासन आयोजित शहर सौंदर्यीकरण आणि स्‍वच्‍छता स्‍पर्धा २०२२ चा निकाल घोषित करण्‍यात आला. यामध्‍ये जिल्‍ह्यातील महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिकेने राज्‍यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

साईबाबा संस्‍थानला अपकीर्त करण्‍यासाठी खोटी पोस्‍ट सामाजिक माध्‍यमावर प्रसारित !

संबंधित सामाजिक प्रसारमाध्‍यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्‍यायालयीन कारवाई करणार असल्‍याचे साईबाबा संस्‍थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्‍हटले आहे.

गुरुचंद्र मलिगई (चेन्‍नई) येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

‘चाणक्‍य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्‍तृत चर्चा केली. त्‍यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.

मी गृहमंत्री असेपर्यंत वाळूचा काळाबाजार होऊ देणार नाही !

देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, वाळूचा काळाबाजार रोखण्‍यासाठी राज्‍यात नवे वाळू धोरण लागू करत आहोत. नव्‍या धोरणानुसार वाळूचे उत्‍खनन करणारी आणि वाळू विकणारी एकच व्‍यक्‍ती नसेल.

‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार सोहळ्‍यातील मृत्‍यूंची उच्‍चस्‍तरीय चौकशी करा !

खारघर येथे झालेल्‍या ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार वितरण सोहळ्‍याला उपस्‍थित भाविकांतील १४ जणांचा मृत्‍यू झाला होता. याचे अन्‍वेषण करण्‍यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.

गोवा राज्य विदेशी मंत्र्यांच्या ‘एस्.सी.ओ.’ बैठकीसाठी होत आहे सिद्ध !

‘एस्.सी.ओ.’ गटामध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, तजाकिस्तान आणि उजबेकिस्तान या ८ सदस्यांचा समावेश आहे. याचे अध्यक्षपद सप्टेंबर २०२२ मध्ये भारताला मिळाले. ही बैठक बाणावली येथे होणार आहे.