सांगली येथील विवाहिता शीतल लेंढवे हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !

अशी मागणी का करावी लागते ?

नगरमधून ‘एम्.आय.एम्.’ची उमेदवारी रहित !

एम्.आय.एम्.’चा उमेदवार असल्यास भाजपचा लाभ होतो, म्हणून मुसलमान समाजातूनच या उमेदवारीला विरोध झाल्याचे सांगण्यात येते. अशरफी सध्या भ्रमणभाष उचलत नाहीत, असे समजते.

सांगली येथील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस !

खर्च नियंत्रण कक्षात सादर केल्यानुसार ९ लाख २ सहस्र ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ सहस्र ९३३ रुपये आहे. या दोन्हीतील फरक २ लाख ७ सहस्र ५७५ रुपये आहे.

महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद !

महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यांत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत.

नाशिक येथे शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून निवडणुकीचा अर्ज भरला !

‘भक्तपरिवार आणि जनता जनार्दन यांच्या वतीने मी निवडणूक लढवतोय’, असे शांतीगिरी महाराज म्हणाले. शिवसेनेनं ‘एबी फॉर्म’ दिलेला नसतांनाही तुम्ही त्यांच्याकडून अर्ज कसा भरला ?

गादीचे वारसदार खरे कि खोटे ही जनता ठरवेल ! – राजवर्धनसिंह कदमबांडे

मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्ताचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्स पद्माराजे यांचा चिरंजीव आहे. गादीचे वारसदार खरे कि खोटे हे जनता ठरवेल.

नागपूर विमानतळ बाँबने उडवण्याची धमकी !

अद्यापही विमानतळे बाँबने उडवण्याची धमकी मिळणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर येरवडा (पुणे) भागातून अब्दुलाह रुमी याला अटक !

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! धर्मांधाला बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या संबंधितांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचे ‘अबकी बार ४०० पार’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात मतदान होणे आवश्यक आहे, असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले

दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याने मी कायदेशीर वारसदार ! – छत्रपती शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा मी कायदेशीर वारसदार आहे.