पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर येरवडा (पुणे) भागातून अब्दुलाह रुमी याला अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बाळगल्याच्या प्रकरणी येरवडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, त्याची चौकशी चालू आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! धर्मांधाला बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या संबंधितांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. – संपादक) या प्रकरणी अब्दुलाह रुमी याला येरवडा पोलिसांनी कह्यात घेतले आहे. रूमी हा मूळचा तमिळनाडूचा रहिवासी आहे. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयितांची माहिती घेण्यात येत होती. येरवड्यातील ‘गोल्फ क्लब चौका’जवळ संशयित थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रुमी याने बनावट कागदपत्रे सिद्ध करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.