सांगली येथील विवाहिता शीतल लेंढवे हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !

सूरज सूर्यवंशी यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी !

(प्रतिकात्मक चित्र)

सांगली, २९ एप्रिल (वार्ता.) – ‘जिल्ह्यातील खेराडे वांगी येथील विवाहिता शीतल अनिकेत लेंढवे हिच्या आत्महत्या प्रकरणी पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी मयत शीतलचे बंधू सूरज सूर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षकांकडे २९ एप्रिल या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी गृहमंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा, पालकमंत्री आणि विभागीय पोलीस निरीक्षक यांना पाठवल्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, बहीण शीतल हिचा विवाह १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी डॉ. अशोक लेंढवे यांचे चिरंजीव अनिकेत यांच्याशी झाला होता. विवाहानंतर शीतल यांना अन्वी नावाची १० वर्षांची मुलगी आहे; मात्र मुलगा नसल्याने तिला सासरचे लोक शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. शीतलचा २ वेळा गर्भपात करण्यात आला होता. ‘आपला वंश वाढणार नाही’, या अपसमजातून सासरे डॉ. लेंढवे, सासू अनिता हे दोघे शीतलला वारंवार त्रास देत होते. त्यामुळे सासरच्या छळास कंटाळून शीतलने आत्महत्या केली आहे.

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ?