५ मे या दिवशी उंच लाटा येण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हिस यांनी ४ मे या दिवशी सकाळी ११.३० वाजल्यापासून ते ५ मे या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

कर्करोगाशी लढणार्‍या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !

‘‘दिव्यांशच्या जगण्याची लढाई ही केवळ एकट्या दिव्यांशची नव्हती, तर ती संपूर्ण कुटुंबाची होती. पारंपरिक उपचारांच्या पुढे जाऊन या कुटुंबाने दिव्यांशच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न केले.

‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी !

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करण्यासाठी ‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी काढण्यात आली. यात रंकाळा तलाव परिसरात आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मतदानासाठी मुंबईत मेट्रो प्रशासनाची तिकिटात १० टक्के सवलत !

येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी ‘महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ’ २० मे या दिवशी मेट्रोच्या तिकिटामध्ये ‘मुंबई मेट्रो मार्ग’ २ आणि ७ या मार्गावरील प्रवाशांना १० टक्के सवलत देणार आहे.

नेहा हिरेमठच्या मारेकर्‍याला फाशी झाली पाहिजे !

पालकांनी स्वत:च्या मुलींशी योग्य संवाद ठेवणे, सजग असणे आणि युवतींनीही स्वत:ची मैत्रिण संकटात असल्याचे लक्षात आल्यास तिला सावध करणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !  

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे; मात्र दुसर्‍या बाजूला ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अप्रसन्नता आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ४ दिवसांचा महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात झाला.

‘डिपफेक’ विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करा ! – महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून ‘डिपफेक’च्या विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप देशात २०० जागासुद्धा मिळवणार नाही ! – आदित्य ठाकरे यांचा दावा

भाजपने सध्या केवळ रत्नागिरीत नव्हे, तर त्याच त्याच सारख्या नावाचे उमेदवार उभे केले आहेत. देशात परिवर्तन होणारच.

गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना वंदन करावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

मला शरण ये, असे सांगून देव सर्व पापे नष्ट करून मनुष्याला मोक्ष प्रदान करतो. त्याच्यापेक्षा मोठे सुख नाही. देवावर सर्व सोपवायचे आहे.