नेहा हिरेमठच्या मारेकर्‍याला फाशी झाली पाहिजे !

  • सोलापूर येथे हिंदु जनआक्रोश मोर्च्यात युवतींची मागणी

  • उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करा !

सोलापूर – कर्नाटकमधील सौंदत्ती येथे नेहा हिरेमठ या युवतीच्या हत्येच्या निषेधार्थ ‘लव्ह जिहाद’वर प्रतिबंधात्मक कठोर कायदा करण्याची मागणी येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’मध्ये करण्यात आली. या वेळी ‘नेहाच्या मारेकर्‍याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’, ‘धर्मजागृती हाच धर्मांतरापासून मुलीबाळींचे रक्षण करण्याचा मार्ग आहे’, ‘नेहा हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है ।’, ‘जय श्रीराम…’,   अशा घोषणा देत युवती, महिला, युवावर्ग आणि धर्माचार्य यांनी आक्रोश व्यक्त केला.  ३ मे या दिवशी शहरातील मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रारंभ झालेल्या मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला होता.

या वेळी भगवे ध्वज आणि नेहा हिरेमठ हिचे छायाचित्र हातामध्ये घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी मोर्च्यात सहभागी झालेल्या युवतींनी केली. मल्लिकार्जुन मंदिरापासून निघालेला मोर्चा पंजाब तालीम, चौपाड, नवी पेठ, सरस्वती चौक मार्गे हुतात्मा चौक येथे विसर्जित होऊन जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी मोर्चा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त, तसेच संवेदनशील भागात ‘कमांडो’ आणि ‘बी.एस्.एफ् सेक्युरिटी’ तैनात करण्यात आली होती.

मोर्च्यानंतर हुतात्मा चौक येथे जाहीर सभेत सहभागी जनसमुदाय

धर्मशिक्षण आणि सजगता हेच ‘लव्ह जिहाद’वर उत्तर ! – श्रीकंठ शिवाचार्य महाराज वक्ते

परधर्मधार्जिण्या नेत्यांमुळेच ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडतात. अशा नेत्यांकडून कारवाईची अपेक्षा व्यर्थ आहे. पालकांनी स्वत:च्या मुलींशी योग्य संवाद ठेवणे, सजग असणे आणि युवतींनीही स्वत:ची मैत्रिण संकटात असल्याचे लक्षात आल्यास तिला सावध करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण आणि सजगता हेच ‘लव्ह जिहाद’वर उत्तर आहे.