भाजप देशात २०० जागासुद्धा मिळवणार नाही ! – आदित्य ठाकरे यांचा दावा

लोकसभा निवडणूक – २०२४

 आदित्य ठाकरे

चिपळूण – येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर  टीका केली. भाजप देशात ४०० नव्हे, २०० जागासुद्धा मिळवणार नाही, असा दावा त्यांनी या वेळी केला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ४ जून या दिवशी भावी खासदार म्हणून विनायक राऊत असतील. भाजपने सध्या केवळ रत्नागिरीत नव्हे, तर त्याच त्याच सारख्या नावाचे उमेदवार उभे केले आहेत. आता हे आम्हाला कोण नकली ? आणि कोण असली ? हे शिकवत आहेत. देशात परिवर्तन होणारच. देहलीत आपलेच सरकार येणार आहे. प्रथम भाजपवाल्यानी ‘अब की बार ४०० पार’अशी घोषणा दिली. त्यानंतर मोदी सरकार, भाजप सरकार आणि आता महायुतीचे सरकार असे नाव दिले जात आहे. यांना कुठेही मते मिळणार नाहीत.

दक्षिण भारतात ‘साफ’ आणि उत्तर भारतात ‘हाफ’ अशी यांची स्थिती होईल. यांनी ३७० कलम हटवले, हे आपलेही स्वप्न होते; मात्र आता ५ वर्षे होऊनही जम्मू-काश्मीर अजून तरी शांत आहे का ? काश्मिरमध्ये यांचा १ तरी उमेदवार उभा रहातो का ? लडाखची तीच स्थिती आहे.