नाशिक – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे; मात्र दुसर्या बाजूला ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकर्यांमध्ये अप्रसन्नता आहे. ४ महिने २७ दिवसानंतर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे; मात्र असे असले, तरी दुसर्या बाजूला ४० टक्के किमान ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन शुल्क आकारण्यात आले आहे. यामुळे कांद्याच्या दरात वाढ होणार आहे. या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले असून भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकून रहाण्यासाठी सरकारला निर्यात शुल्क अल्प करावे लागेल, असेही निर्यातदारांनी सांगितले.