नाशिकमध्ये जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक आणि भाववाढ करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जीवनावश्यक वस्तूूच्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने चालू ठेवावीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल…

कोरोनाच्या भीतीने मुंबई सोडणार्‍या परप्रांतियांना पोलिसांनी पकडले

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक परप्रांतीय मुंबई सोडून जात असल्याचे पोलीस पडताळणीत आढळून येत आहे. २८ मार्च या दिवशी पालघर येथून दुधाच्या टँकरमधून राजस्थान येथे निघालेल्या १२ नागरिकांना कल्याण येथे पोलिसांनी पकडले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष)…

दिंडोरी (नाशिक) येथे अवैध मद्यसाठा जप्त

दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका ‘हॉटेल’वर धाड टाकून ४ सहस्र ६४१ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.

शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार १ मासाचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार ! – खासदार संजय राऊत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

कोरोना रुग्णांविषयी अफवा पसरवल्याप्रकरणी नागपूर, रायगड, पुणे येथे ८ जणांवर गुन्हा नोंद

कोरोनाविषयी जनजागृती करून समाजातील लोकांना साहाय्य करण्याऐवजी समाजात अफवा पसरवून लोकांना भयभीत करणारे समाजद्रोहीच आहेत ! त्यामुळे अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी !

दादर येथील भाजीबाजार बंद ठेवण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दादर (पश्‍चिम) रेल्वेस्थानकाच्या बाहेर भरणारा भाजीबाजार २९ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. तसा आदेश पालिकेकडून देण्यात आला आहे.

आपल्याला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीप्रगत देशांत कोरोनामुळे सहस्रावधी बळी जात आहेत. त्यामुळे ‘आपल्याला काही होणार नाही’, या भ्रमात राहू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या

देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.

बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक

बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते.