आपल्याला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

मुंबई – अतीप्रगत देशांत कोरोनामुळे सहस्रावधी बळी जात आहेत. त्यामुळे ‘आपल्याला काही होणार नाही’, या भ्रमात राहू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे. २८ मार्च या दिवशी जयंत पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला. या वेळी जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ का घोषित केले ?, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल, तर या दिवसांत त्या व्यक्तीची लक्षणे समजू शकतील. त्यामुळे शिस्त पाळली पाहिजे, नाहीतर पुष्कळ मोठे परिणाम भोगावे लागतील.