बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक

ठाणे – बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते. (बंदीवान २ वेळा पळून जाणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करते ! संबंधित पोलिसांवर कारवाई करायला हवी, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)