दुर्गनाद प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी केलेल्या कवलापूर (जिल्हा सांगली) येथील सिंहगडाच्या प्रतिकृतीचे अनावरण !

दुर्गनाद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी ३ मासांच्या अथक प्रयत्नांनंतर कवलापूर येथे सिंहगडाची प्रतिकृती साकार केली आहे.

सिंधुदुर्गात गत २४ घंट्यांत कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३३ झाली आहे.

वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू

अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.

मालवण येथील ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !

ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्‍वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !

कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.

सनातनचे ग्रंथ अध्यात्मातील दीपस्तंभ ! – आमदार महेश शिंदे, शिवसेना, कोरेगाव

दीपावलीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली आणि वरील उद्गार काढले.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘जेनिश मसाले’ या उत्पादनाच्या आस्थापनाने रामायणाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट हटवली !

विडंबन करणार्‍या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !

प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती

कोरोनाचे संकट असल्याने देवदर्शन घेतांना भाविकांनी काळजी घ्यावी ! – खासदार संजय राऊत

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजे १६ नोव्हेंबरपासून पुन्हा खुली करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी ‘प्रार्थनास्थळांवर कोरोनाविषयाची पूर्ण काळजी भाविकांनी घ्यावी’, असे आवाहन केले आहे

दिवाळी फटाक्यांविना साजरी होते, तर ईद प्राणी हत्येविना का नाही ? – कंगना राणावत, अभिनेत्री

कंगना यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चला, दिवाळी फटाकेमुक्त (फ्री), ख्रिसमस झाडांना कापल्याविना अन् ईद प्राण्यांची हत्या केल्याविना साजरी करूया. सर्व लिबरल्स मंडळी माझ्याशी सहमत आहेत का ?