|
मुंबई – गुजरात येथील ‘जेनिश मसाले’ या उत्पादनाच्या आस्थापनाने प्रसिद्धीसाठी फेसबूकवर एक पोस्ट केली होती. त्यात रामायणाचा प्रसंग सांगण्यात आला होता. त्यात लिहिले होते की, ‘जेव्हा तुमचा मित्र म्हणतो, ‘कोणताही मसाला टाक, काय फरक पडतो ?’ त्यावर श्रीराम भक्त त्याला म्हणतो, ‘याच्या पोटावर बाण मारा प्रभु.’
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
या पोस्टविषयी धर्मप्रेमींनी हिंदु जनजागृती समितीला कळवल्यावर समितीने याचा वैध मार्गाने विरोध करण्याचे हिंदूंना आवाहन केले. त्यानंतर हिंदूंनी संघटितरित्या केलेल्या विरोधानंतर काही घंट्यांतच ही पोस्ट हटवण्यात आली.