मुंबई – राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजे १६ नोव्हेंबरपासून पुन्हा खुली करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘प्रार्थनास्थळांवर कोरोनाविषयाची पूर्ण काळजी भाविकांनी घ्यावी’, असे आवाहन केले आहे, तसेच ‘देवांचे आशीर्वाद महाराष्ट्रावर आहेत. काही अंशी ते संकट आपण परतवून लावले आहे; पण अजूनही आपण सावध राहिले पाहिजे’, असेही ते म्हणाले. ‘कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आज माझा वाढदिवस साजरा करणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की,
१. मंदिरे उघडण्याविषयी कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानेच मंदिरे बंद होती. महाराष्ट्र स्वाभिमानी राज्य आहे.
२. ईर्ष्या आणि अहंकार महाराष्ट्राला चालत नाही, हे लोकांनीही दाखवून दिले आहे.
३. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अन्य मार्गाने कलम ३७० हटवण्याचा प्रयत्न चालवला आहे; पण ते योग्य नाही.