विधानभवनासमोर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न !

विधानभवनासमोर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई –  राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असतांना २३ ऑगस्ट या दिवशी विधानभवनाच्या बाहेर धाराशिव येथील सुभाष भानुदास देशमुख यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आग विझवत देशमुख यांना जवळच्या रुग्णालयात भरती केले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.