‘भारतमाता की जय’ म्हटल्यामुळे मिशनरी शाळेने विद्यार्थ्याला दिली शिक्षा !

‘भारतमाता की जय’ म्हटल्याने शिक्षा होण्याला हा भारत आहे कि कोणता कट्टर ख्रिस्ती अथवा इस्लामी देश ? संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

भोपाळमधील ‘हलालपूर’चे नाव पालटण्याचा प्रस्ताव संमत

भोपाळ नगरपालिकेच्या बैठकीत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून शहरातील लालघाटी आणि हलालपूर भागांची नावे पालटण्याची मागणी केली.

बलात्कार्‍यांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवा !

बलात्कारांच्या प्रकरणांतील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले, तर इतर कुणीही असा गुन्हा करतांना एक सहस्र वेळा विचार करील, असे विधान भाजप सरकारमधील माहिती, पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

मध्यप्रदेशात बस आणि चारचाकीच्या भीषण अपघातात ११ ठार

राज्यातील बैतुल-अमरावती राज्य महामार्गावर ३ एप्रिलच्या उत्तररात्री रिकामी प्रवासी बस आणि ‘तवेरा’ चारचाकी गाडी यांचा भीषण अपघात झाला. यात चारचाकीतील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.

खंडवा (मध्यप्रदेश) येथील मदरशातील मौलानाकडून ६ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

मदरशांमध्ये देशविघातक कृत्ये होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. बलात्कार, लैंगिक शोषण आदी गुन्ह्यांच्या बातम्याही येत असतात. त्यामुळे अशा सर्वच मदरशांना केंद्र सरकारने आता टाळे ठोकले पाहिजे !

शेख जाहिद याने पंडित असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात  

मध्यप्रदेशच्या शाजापूरमध्ये एक हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली आहे. शेख जाहिद नावाच्या मुसलमान व्यक्तीने पंडित असल्याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आरोपी जाहिद याने हिंदु तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

भोपाळमध्ये वायूगळतीमुळे १५ जणांची प्रकृती बिघडली

मदर इंडिया कॉलनीतील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी क्लोरीन सिलिंडरमधून वायूगळती झाल्याने काही नागरिकांना खोकला आणि श्‍वास घेतांना त्रास जाणवू लागला.

मध्यप्रदेशात अवैध फटाका गोदामात स्फोट; ३ ठार !

राज्याच्या मुरैना जिल्ह्यात फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की, ज्या इमारतीत फटाके बनवले जात होते, ती इमारत पूर्णपणे कोसळली.

 गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला केले रक्तबंबाळ : गुन्हा नोंद !

अमानवी कृती करणार्‍या शिक्षिकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या विद्यालय प्रशासनालाही यासाठी उत्तरदायी ठरवून त्यांच्यावरही कारवाई का करू नये ?