इंदूर (मध्यप्रदेश) येथील मंदिरातील विहिरीवरील स्लॅब कोसळून भाविक विहिरीत पडले !

१० जणांना काढले बाहेर !

घटनास्थळ

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील पटेल नगरातील श्री बेलेश्‍वर महादेव झूलेलाल मंदिरातील विहिरीवर बांधण्यात आलेला स्लॅब कोसळून त्यावर उभे असणारे भाविक विहिरीत पडले. यानंतर अग्नीशमन दल, पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी साहाय्यता कार्य चालू केले.

१० जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण आता असून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न चालू आलेे.