साळगाव येथे आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस

गुन्हे अन्वेषण विभागाने साळगाव येथील व्हॅली व्हीव रिसोर्टमधून कार्यरत असलेले आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे. संकेतस्थळ आणि ‘ऑनलाईन’ विज्ञापने यांच्या माध्यमातून हे रॅकेट चालू होते.

मुख्यमंत्र्यांचा १९१ पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ५ डिसेंबर या दिवशी राज्यातील १९१ पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला. ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’, या योजनेचाच हा एक भाग होता.

गोवा दंत महाविद्यालयाचे वाढीव शुल्क अखेर मागे

गोवा दंत महाविद्यालयाशी निगडित दोन्ही संस्थांचे वाढीव शुल्क मागे घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

कर्नाटकने नियम धाब्यावर बसवून म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवले !

म्हादई पाणीतंट्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट असतांनाही कर्नाटक शासनाने म्हादई नदीचे पाणी वळवणे चालूच ठेवल्याचा दावा ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.

६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार

१९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्‍या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

करमळी, वाळपई येथील नागरिकांचा खंडित वीजपुरवठ्याच्या विरोधात वीज खात्यावर मोर्चा

सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

एल्विस गोम्स यांची ‘आम आदमी’ पक्षाला सोडचिठ्ठी

पक्षाचे माजी समन्वयक एल्विस गोम्स यांनी ‘आम आदमी’ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. या समवेतच पक्षाचे माजी महासचिव प्रदीप पाडगावकर आणि ‘आप’चे अनेक कार्यकर्ते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले.

गोव्यात खाणी पुढील ६ मासांत चालू होऊ शकतात! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण न झाल्यास गोव्यातील खाणी पुढील ६ मासांत चालू होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

गोवा फाऊंडेशनसह पर्रा ग्रामस्थांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाची सरकारला नोटीस

पर्रा गावासाठी अधिसूचित केलेला बाह्यविकास आराखडा रहित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांसाठी ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’ पुन्हा चालू करा ! – जॉन नाझारेथ, गोवा फॉरवर्ड

गेल्या वर्षीपासून सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही योजना रहित करण्यात आली होती.